पाऊसप्रिये

IMG_7948 copy

पाऊसप्रिये,
या वर्षीचा पाऊस इथे चांगलाच भिजवतोय पण तुझं पत्र काही आलं नाही, पाऊस तुझ्याकडे हजेरी लावायचा विसरला तर नाही ना!
तुझ्या घरी नसेल पडला पाऊस तर, वेलबुट्टीच्या नक्षीदार डबीत भरावा आणि तुझ्याकडे पोहोचवावा म्हणतो. बरं पाऊस नाही तर नाही, किमान पावसाआधी आसमंतात दरवळणारा वाऱ्याबरोबर आलेला मातीचा गार सुवास? तो ही नाही? थांब, एका कुपीत भरून पाठवतो, कानामागे अडकव त्याचा फाया.
पण वर्दी देणारे ढग तरी पोचलेत न? नसतील आले ढग दाटून तर तातडीचे खलिते धाडून पाठवून देण्यात येतील. काय म्हणतेस? पण इतका सारा अट्टहास कशासाठी? सृष्टीचा सर्जनसोहळा एकत्र अनुभवण्यासाठी….

उत्तराची वाट बघतोय,

तुझ्यासारखाच
पाऊसप्रेमी

~~~

Image by Aditya Sathe (2011)

Leave a Reply

%d bloggers like this: