कैफियत
मित्रांनो नमस्कार,, आज मी काही तुमच्याशी गप्पा मारणार नाहीये. आपल्यावर हे बारीक नजर ठेऊन असलेले हे मोट्ठे लोक आहेत नं.. हो हो तुम्हीच, या असे समोर येऊन बसता का?? तुमच्याशीच बोलायचं थोडं. मित्रांनो तुम्ही असे माझ्या बाजूला येऊन बसा. म्हणजे कसे व्यवस्थित २ गट होतील ना. तर मी म्हणत होतो कि मी तुमच्याशी गप्पा मारणार नाहीये. तर आज मी मांडणारे एक कैफियत. आपल्या सगळ्यांच्या वतीनी या मोठ्यांसमोर. काय म्हणताय कैफियत कसची ना? सांगतो कि… आपले आमच्या वागण्या बोलण्यावर काही आक्षेप आहेत, जे साहजिकच आम्हाला मान्य नाहीत, त्या बद्दल…. आमची हि कैफियत ऐकून घेऊन त्यावर काही तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे आणि तशी अशा वाटते म्हणून मांडतो आहे तुमच्यासमोर..
सगळ्यात मोठ्ठा आरोप तुम्ही लोकं करता तो म्हणजे आमची सर्जनशीलताच संपली आहे.. हि गोष्ट तर अजिबात मान्य नाही आम्हाला. आमची सृजनाची क्षेत्रच जर वेगळी असतील आणि ती तुम्हाला माहितीच नसतील तर सर्जनशीलता दिसेलच कशी?? आज दिवसाला एक या दरानी संगणकात बदल होत आहेत. नवनवीन डिजिटल उत्पादने बाजारात येत आहेत. अनेक सोयी सुविधा उपलब्ध होत आहेत. मोबाईलसारख्या उपकरणांमध्ये प्रचंड झपाट्यानी बदल होत आहेत, जे आपण सगळ्यांनी अंगिकारले आहेत. जग अगदी एका बटणाच्या दुरीवर आलं आहे. हि सगळी कुणाची तरी सर्जनशीलताच आहे नं???
आज अनेक नवनवीन लेखक, कवी उदयाला येत आहेत, जुन्या पुस्तकाच्या अगदी नियमीतपणे आवृत्या निघत आहेत; तरी ओरड आहेच आम्ही काही वाचत नाही.. सारखं ऐकवतात “वाचाल तर वाचाल”. पण आजच्या घड्याळाच्या काट्यांवर पळण्याच्या दिवसात पुस्तकांचा रसास्वाद घ्यावा तरी कसा? त्यावर पण आम्ही उपाय शोधलाय नं. पुस्तकांची अभिवचन करून ती ध्वनिमुद्रित करून ठेवली आहेत. त्यांचा आस्वाद आम्ही घेत असतोच की. अशा डिजिटल पुस्तकांची ई-वाचनालये सुद्धा बनवलीत आम्ही.
आमच्यावर अजून एक जाहीर आरोप होतो.. “तुम्ही दिवसभर नुसते या खोक्यांसमोर बसा आणि चष्म्यांचे नंबर वाढवा. कुठे बाहेर म्हणून जायला नको.” अहो आम्हाला पण फिरावासा वाटतं नं. आम्ही फिरतो सुद्धा. आणि जर फिरत नसतो तर वैनतेय, पगमार्क्स यांसारख्या ट्रेकिंगच्या आणि इतर अनेक पर्यटन संस्थांचे कारभार इतक्या सुरळीत आणि तेजीत चालेल असते??? कधीच बंद पडायला हव्या होत्यान ना..
आमच्यातही काही दोष आहेत ना ते नाकारता येणारच नाहीत. तशी इच्छा पण नाहीये. नुकते कुठे ते कळायला लागलेत पण अजून वळले नाहीयेत. वळतीलही हळू हळू. अनेक प्रश्न, गंभीर समस्या थैमान घालताच आहेत की. खालावलेली नितीमत्ता, धर्मातील पंथांमधील तेढ, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ह्रास, हे सगळे कमी होते म्हणून राष्ट्रहितापेक्षा स्वहित मोठे मानून देश विक्रीसाठी बाजारात उभा केला गेला. सगळीकडे घाण झाली आहे. पण घरची साफसफाई करण्यात हात कोण खराब करून घेईल? सगळे आपले ग्रीन कार्डच्या मागे. डिग्री मिळाली की पळाले तिकडे. खोऱ्यानी मिळणारा पैसे दिसतो पण त्याच खोऱ्यानी तो तिथे खर्च पण करावा लागतो हे इथून दिसत नाही ना. तरी आपले सगळे पळतात तिकडे.
इथेही काही कमी पैसा नाही हो. इथे पण बख्खळ मिळतो. मग आमचे डोळे थोडे निळसर हिरवट दिसु लागतात. पैश्यांचा रंग येतो ना त्यात. मग आपले आई वडील अचानक भंगार माल वाटू लागतात. मग त्यांची रवानगी होते वृद्धाश्रमात. विचार पण करत नाहीत की आज पैसे मिळवण्याइतकी जी काय आपली लायकी आहे ती यांच्यामुळेच. बिचारे आपले निमूटपणे स्वतःच्या कष्टानी उभं केलेलं घर सोडतात. वर्ष वर्ष साधी विचारपूस पण त्यांच्या वाट्याला येत नाही.
नैतिकतेच्या नावानी तर बोंब झाली आहे. चित्रपट आणि दूरदर्शन मालिका तर अगदी बघवत नाहीत. अरे ते बालगंधर्व पुरुष असून कधी पदर ढळत नसे त्यांचा. आताच्या नट्यातर कधी आमचे कपडे फेडताय याचीच अगदी आतुरतेनी वाट बघत असतात जणू. आणि अंधानुकारणाचा जन्मसिद्ध हक्क बजावण्यासाठी तरुण मंडळी टपलेलीच असतात. ते तरी काय करणार त्यांना अंगभर चापूनचोपून साडी नेसलेली स्त्रीच आजकाल दिसत नाही ना कुठे.
मान्य आहे आमच्यात मद्य संस्कृती वाढते आहे. त्याला सोसायटी स्टेटसचा सोनेरी मुलामा चढवला जातोय. सरकारचाही त्याला अनुदानांसकट भक्कम पाठबळ मिळतोय. पण जे वाइट त्याला चांगला कसं म्हणायचं? इतरही अनेक छोटे मोठे दोष आहेत आमच्या पिढीत. याचा अर्थ असा नाही की आम्ही अगदीच टाकाऊ आहोत.
मित्रांनो आपली कैफियत मांडता मांडता मी त्यांच्याही कैफियतीचे काही काही मुद्दे मांडलेत. काय हो, बरोबर ना?? मग… आपण त्यांना वचन द्यायचं ना? दोष दूर करण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांचं.. हा थोडं वेळ द्यावा लागेल. कष्ट पडतील थोडे.थोडं अवघड आहे. पण करणार ना? मग देऊ होकार??? माझा तर आहेच हो पण तुमच्याही होकाराची वाट बघतोय…
Discover more from Adi's Journal
Subscribe to get the latest posts sent to your email.
Yahh nice one… Mhanawa aah aamhi navya sobat junahi japatoy….. etaka lakshat ghya mhanawa….!! mhanaje aamhi aagadich kahi gone kess nahiyot… 🙂
mast lihileyes….Donhi baju agdi barobar mandalyet…he sagalyanni vachayala have…this will help to understand d mutual expectations & duties….keep it up…
KAIFIYAT CHANGALI AHE..CHHAN LIHILAYES…
Interesting well balanced article! Thanks.