पुन्हा एकदा आपल्या भेटीला मराठीतून येतोय.. आज कालजिकडे बघावा तिकडे नुसते उसासे आणि हताश निश्वास ऐकू यायला लागलेत.. जणू सगळीकडे कायम पराजय हाती लागतो आहे आणि दूर दूर पण कुठे विजयाचा साधा कवडसा तर सोडा पण छोटी तिरीप पण नाही दिसत आहे. सगळे आपले कायम चिंतेतच दिसतात. काय तर चेहेऱ्यावर भाव… सगळे स्वतःला समर्थ रामदासच समजतात… एकाच भाव.. “चिंता करितो विश्वाची”. अगदी बालवाडीतल्या मुला-मुलींपासून ते अगदी शंभरी गाठलेल्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांच्याच. बालवाडीतल्या छोट्याला चिंता शाळेत का जायचं याची. प्राथमिक शाळेतले एकाच चिंतेत; खेळायला मिळेल?? अभ्यास संपेल हि चिंता तर माध्यमिक शाळांमधल्या लोकांना खूप चालत असते. कॉलेजकुमार तर कायम आपल्या प्रेमाच्याबद्दल भयाण चिंतेत असतात. एकमेकांबरोबर असले तर काय करतात कोण जाणे?? पदवीधर बिचारे सदैव नोकरी मिळेल का याच्या विचारांनी हैराण. नोकरदार आणि व्यावसायिक आपले उद्योगधंद्यांच्या चिंतेत. गृहिणी घर कसा चालवावे याच्या विचारात पार डोक्याच्या वरपर्यंत बुडालेल्या. वान्प्रस्थींना वेगळीच चिंता; “सून आपल्याला ठेवून घेईन घरी कि देईल हाकलून घरातून”….. चिंता आणि चिंता…
का सगळा आनंद हरवला आहे??? कोणी तरी हसायला शिकावा रे यांना.. पुन्हा एकदा या काळात आचार्य अत्रे आणि पु ल यावेत असा वाटायला लागलाय… कारण त्यांची पुस्तक कोणी वाचत नाहीत.. किमान ते आले आणि बोलले तर हसतील अशी धूसर शक्यता मला वाटते आहे.. तुम्हाला काय वाटतं???
Leave a Reply