Category: कविता

  • मुखवटा

    मुखवटा

    लपवले जे आहे मनाच्या तळाशी, कितीदा उफाळून येई किनारी, आंदोलती वादळे जरी अतरंगी, चेहेऱ्यावरी स्तब्धतेचा मुखवटा…. दिसामागुनी दिवस जाती निघूनी, तरी वादळे नाही शमली जराही, अचानक अशी ती येता समोरी, तत्क्षणी गळाला मुखीचा मुखवटा…. Image credit : Suvarna Sohoni

  • एकांतात मी तुला बघायचो, एकटक तिच्याकडे बघताना, ऐकू यायची ती धडधड, घालमेल मनाची वाढताना, वाचले मी डोळ्यातले भाव, ओठांवर येऊन अडकताना. अनुभवलंय मूकपणे मी, अबोल्यातून नातं घडतांना, सांगणार कसं तुला हे सारं, या आरशाला आवाज नसताना……

  • झड

    झड

      बघ वाढली बाहेर आज पावसाची झड, तुझ्या आठवांनी सये मन झाले माझे जड. आठवांनी त्या क्षणांच्या वेचले जे तुझ्यासवे दोन विहिरी डोळ्यांच्या बघ भरती आसवे. आला विचार हा मनी पण सवाल हा पडे, पावसाच्या काळ्या मेघा धाडावे का तुझ्याकडे? निश्चयाची खूण मग माझ्या मनाशी बांधून, धाडतो त्या मेघाला मी, हाच निरोप घेऊन…..   Image…

  • राज़

    इन आँखोसे कहो न कुछ बयाँ करे, जो छुपाया है दिलमे वो हसींन राज़ है।

  • डाव बुद्धिबळाचा

    डाव बुद्धिबळाचा

    बघितला तुझा व्यूह, निरखून दिशा दाही. पटावरच्या काळ्या घरी तू सूर्य घातलास, याचे सारे मोहोरे मारले, मनाशीच म्हटलास. पटदिशी दिवा लावून, माझ्यापुरता उजेड केला पायाखालचा रस्ता माझ्या, उजळून सोपा केला. लगेच हाती प्रलय घेऊन, केलीस पुढची खेळी, मनूच्या नावेत बसून निसटला बघ तुझा बळी. तुच्छ कटाक्ष टाकलास, कालचक्र माझ्यावर सोडून, काळालाच मोडूनतोडून मी क्षण क्षण…

  • पावसाळ्याचे स्वागत

    Welcoming monsoon with words is always feel good thing… for this monsoon these lines come to my mind, तप्त झाल्या या पृथेला, ओढ होती काळीमेची, काहिली झाली जगाची, आस लागे पावसाची, त्रासलेले जीव सारे, तत्क्षणी आनंदले, ज्या क्षणी क्षितीजावरी ते, कृष्णमेघ दाटले…..