Author: Adi Sathe

  • देवाचे मौन

    देवाचे मौन

    IMG_0099-01
    भुलेश्वर – छायाचित्र सौजन्य – आदित्य साठे

    गाभाऱ्यातल्या देवाचे, आज चक्क मौन सुटले,
    ऐकणारा एकटा मी, कानांचे पारणे फिटले,
    बरे झाले आत्ता आलास,
    अगदी दबक्या आवाजात बोलला.
    दिवसभर मागण्यांचा मारा, नवसांचा मारा सोसला.
    आठवतं तुला, आपल्या गप्पा व्हायच्या?
    लहानगा होतास, येऊन बसायचास,
    निरागस असायचे प्रश्न तुझे,
    आजूबाजूच्या गोष्टींचे वाटे कोडे,
    हळू हळू गर्दी वाढली,
    तुझी माझी भेट दुरावली.
    मग पुढे काय झालं मलाही कोडंच आहे,
    कोणाचं काय चुकलं कळणं अवघडच आहे,
    बँक पोस्टातल्यासारखे चौके इथं कोणी आणले?
    प्रसाद, फुलं आणि नारळ विकून कोणी खाल्ले!
    दर्शन रांगाही वेगळ्या झाल्या,
    माझ्या वेळेचाही लिलाव केला…
    या साऱ्या गजबजाटावर आवाज करून,
    घंटा बडवून बडवून मागण्यांचे नुसतेच आवाज येतच होते.
    क्षण दोन क्षण दिसणाऱ्या डोळ्यांत भाव मात्र नव्हते
    आज सारं काही शांत झाल्यावर,
    गाभाऱ्याची दारं बंद झाल्यावर,
    केवळ समई तेवतअसतांना तू आत आलास,
    अन् नकळत माझ्या दगडी चेहेऱ्यावर हसू उमटलं,
    आत आलास, शांतपणे बंद दाराच्या जाळीतून
    अगदी थेट माझ्या डोळ्यात पाहिलेस
    अन् आज चक्क माझे मौन सुटले,
    तुझ्याशी बोलून बरे वाटले


    कविता का अर्थ हिंदी में…


    मंदिरके भगवान ने आज चुप्पी तोड़ी, और मंदिरमें सुनने के लिए मै अकेलाही था।
    अच्छा हुवा जो अब आए, बहोत धीमी आवाज़ में भगवान बोले।
    दिनभर इनकी मांगे सुनो, मन्नतोंकी मार झेलो।
    तुम्हे याद भी है? ढेर सारी बातें होती थी अपनी।
    बहोत छोटे थे तुम, आके बैठा करते थे यही।
    बहोतही सरल सवाल होते थे तुम्हारे, आसपास घट रहे घटनाओंपर।
    धीरे धीरे भीड़ बढ़ती गई , और तुम्हारी मुलाक़ात घटती।
    आगे क्या हुवा ये मुझे भी नहीं पता, गलती किसकी थी ये भी नहीं समझा।
    बैंक और पोस्टऑफिस जैसे काउंटर किसने खोले?
    प्रसाद, फूल और नारिया बेच किसने खाए?
    दर्शनकी कतारे भी बट गई ,
    मेरे समयकी भी नीलामी हो गई।
    ये सारे कोलाहलके ऊपर आवाज उठाते हुवे,
    बड़े जोर जोरसे घंटा बजा बजाकर “हमारी माँगे पूरी करो” के नारे लगते ही रहे.
    पल दो पल दिखते आँखोसे भाव बिलकुल गायब थे।
    आज तुम आए, सब शांत होने के बाद,
    गर्भगृहके दरवाजे तक बंद हो गए है।
    तू अंदर आए तो सिर्फ ये तेल का दिया जल रहा था,
    और मेरे पथरीले चहरे पे एक हसी खिल उठी।
    तुम अंदर आए, शांतिसे, बंद दरवाजेके जालीसे,
    सीधा मेरी आँखोमे झांक कर देखा।
    और… आज मैंने चुप्पी तोड़ी,
    तुमसे बात करके बड़ी ख़ुशी हुई।

  • बहुदा, जाग आली

    IMG_20190108_084645_376

    खिडकीच्या फुटक्या काचेतून आज बारीक उजेड दिसला,
    निद्रिस्त वास्तुपुरुषाला, बहुदा, जाग आली….
    कित्येक दशकांच्या स्वस्थ झोपेतून आज
    या अस्वस्थ करणाऱ्या खडखडाटाने जेव्हा हा जागा झाला,
    तेव्हा त्याने अंग सैल करायला आळोखे पिळोखे दिले असतील? तुमच्या आमच्या सारखे?
    या थंडीतल्या बोचऱ्या वाऱ्याची झुळूक फुटलेल्या तावदानातून आत शिरली आणि पेटलेल्या मिणमिणत्या दिव्यानी आपली ज्योत थरथरवून हुडहुडी भरल्याचे जाहीर केलं.
    त्याच वेळी, दोन फूट खोल मातीच्या उबदार पांघरुणातून अचानक थंडीत बाहेर यायला लागलं म्हणून हा म्हातारा कदाचित चरफडून शिव्याशाप देत असणार.
    नाही तर धडामकन् आवाज करत, एक तुळई खाली आली नसती.
    ‘बरे झाले आपोआपच पडली…’ असे जेव्हा उद्या हा वाडा उतरवायला येणारे मजूर म्हणतील तेव्हा या म्हाताऱ्याचा चेहरा पाहीन म्हणतो…..
    ~
    आदित्य साठे
    ०८-०१-२०१९


    कविता का थोडासा मतलब हिंदी मे…

    आज, तुटे हुये शीशेसे हलकीसी रौशनी दिखी, सालोंसे सोय वास्तुपुरुष शायद जाग चुका है|कई दशकोंकी गेहरी निंदसे जब इन परेशान करती खडखडाहटसे जब जनाब उठे होंगे, तो क्या आप और हम जैसेही आलासाये होंगे? आज कि सर्द रात मे जब चुभती हवा तुटे खिडकीसे अंदर पोहोची, तो जलती लौ भी थरथराकर थंडसे कांप उठी| शायद उसी समय, दो-ढाई फिट जमीन की गर्म राजाईसे इस कपकपाती थंड मे बाहर आना पडा, इसलिये शायद, ये बुढा चीढ कर गलीया बक गया| वरना धडामSS कर के ये छत न गिरी होती| “अच्छा हुवा जो अपने आपही गिर गयी…” कल ये हवेली गिराने जब आनेवाले मजदूर ये कहेंगे, तब ये बुढा चेहरा देखुंगा शायद…

  • काळजात उतरलेली कट्यार

    काळजात उतरलेली कट्यार

    18192468_1919179508297339_3990675473360239615_o.jpg

    अगदी राजे रजवाड्यांच्या काळापासून साहित्य संगीत नृत्य नाट्य आपल्या महाराष्ट्राला तसे नवे नाही. पण अभिनय आणि संगीत यांच्या एकत्र जोडीने मराठी मनाचा पगडा घेतला तो संगीत नाटकाच्या उदयापासून. देवल, खाडिलकर, मास्टर कृष्णराव, बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, राम गणेश गडकरी, इत्यादींपासून सुरू झालेला हा लेखक संगीतकार गायक ही नावं घेत घेत आपण पोचतो ते पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्यापर्यंत. सौभद्र, शाकुंतल, एकच प्याला, वगैरे नाटकांतून घेतल्या गेलेल्या विषयांपेक्षा एकदम वेगळा विषय दारव्हेकर मास्तर घेऊन आले. तसा तो विषय काही अगदीच अपरिचित होता अशातला भाग नाही. महाराष्ट्राला असलेल्या थोर शास्त्रीय संगीत परंपरेत या विषयाची थोडी बहुत चर्चा होतीच. पण संगीतात अगदी खोलवर रुजलेल्या घराणेशाहीला इतक्या उघडपणे रंगमंचावर आणणे हे सुद्धा एक कौतुकच. आणि या विषयाला चार चांद लावले ते पंडित अभिषेकींनी. दोन घराण्यातील सांगीतिक भेद, वेगवेगळी सौंदर्यस्थानं आणि नाटकातील द्वंद्व अगदी ठसठशीतपणे उभं केलं आपल्या पदांमधून.

    katyar_kaljat_ghusali_ver6

    आणि नुकताच ३० तारखेला याच नाटकावर आधारित अफलातून चित्रपट Zee5 वर रिलीज झाला. सुबोध भावे पुन्हा एकदा ही अजरामर कलाकृती मराठी रसिकांसमोर घेऊन आला “कट्यार काळजात घुसली” या चित्रपटातून. जसं हे नाटक रुपेरी पडद्यावर उभं करणं मोठं कौशल्याचं आणि जबाबदारीचं काम होतं तसंच त्याचं संगीत निर्माण करणं एखाद्या शिवधनुष्यासारखच होतं. अभिषेकी बुवांनी संगीत दिलेली आणि वसंतरावांनी अजरामर केलेली पदं पुन्हा रेकॉर्ड करणं आणि शिवाय मूळ चालींमध्ये मिसळून जाईल अशा नव्या चाली बांधणं आजिबात सोपं काम नव्हतं. पण शंकर एहसान लॉय या त्रिकुटानी हे शिवधनुष्य नुसतं पेललं नाही तर त्यावर प्रत्यंचाही चढवली. मूळ नाटकातील ‘या भवनातील गीत पुराणे’ या पदाच्या ऐवजी येणार ‘दिल की तपिश’ हे  गाणं अगदी खांसाहेब आफताब हुसेन यांच्या गायकीचे होऊन गेले आहे. आज अभिषेकी बुवा असते तर त्यांनी या चालीसाठी तिघांचे अफाट कौतुक केलं असतं.

    तसे पाहिले तर सारेच भारतीय चित्रपट संगीत प्रधानच. त्यामुळे पाश्चात्य जगात असलेली musical film ही संकल्पना आपल्याकडे वेगळी अशी निर्माणच नाही झाली. पण तरीही मराठी चित्रपटातून काही संगीताच्या सभोवती कथा गुंफलेले काही चित्रपट आधीही होऊन गेले. लोकशाहीर राम जोशी, पिंजरा, आणि काही वर्षांपूर्वी आलेला नटरंग हे चित्रपट महाराष्ट्राच्या लावणीभोवती गुंफले गेले. पण प्रामुख्याने तथाकथित पांढरपेशा समाज आणि तमाशा यांच्यात असलेली दरी मोडून कुण्या एकाचा त्या क्षेत्रात निषिद्ध मानला गेलेला प्रवास या एका समान धाग्याने हे चित्रपट बांधले गेले आहेत.

    या व्यतिरिक्त २००९ मध्ये आलेला जोगवा हा यल्लम्मा देवीच्या नावाने जोगवा मागत फिरणाऱ्या जोगत्यांच्या आयुष्यावरचा एक राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला चित्रपट. हे जोगते देवीची भजनं, जोगवे गात गात जोगवा मागत आयुष्य घालवत असल्याने या चित्रपटाची धाटणी सुद्धा एक musical चीच आहे. पण कट्यार… चा विषय आणि सांगीतिक संदर्भच त्याला या साऱ्या चित्रपटांपासून वेगळा काढतो.

    नाही म्हणायला Morning Raga हा शबाना आझमी यांची भूमिका असलेला चित्रपट शास्त्रीय संगीताची बाजू चित्रपटांमध्ये घेऊन आला होता. आजच्या काळात जेव्हा आधुनिक संगीताचा बोलबाला आहे, रॉक मेटल वगैरे संगीत मोठ्या प्रमाणावर सादर होतं अशा वातावरणात शबाना आझमींच्या पात्राला त्यांचे कर्नाटक शास्त्रीय संगीत एक मोठया कार्यक्रमात सादर करायची महत्वाकांक्षा घेऊन जगत असते. पण कट्यारमधली महत्वाकांक्षा आपल्याला एका निराळ्याच जगात घेऊन जाते. कट्यारची गोष्ट उलगडते ती राजेरजवाड्यांच्या काळात जेव्हा कला आणि कलाकार राजाश्रयाने वाढत होती. ही एक अप्रस्थापित संगीतशैलीची प्रसिद्धीसाठीची महत्वाकांक्षा आहे.

    ही महत्वाकांक्षा, एक वेगळ्याच पातळीवरचे अटीतटीचे सांगीतिक द्वंद्व, मानवी स्वभावाचे ईर्षा, असूया, प्रेम, कालासक्ती असे वेगवेगळे पदर हे सारे एक चित्रपटातून दाखवतांना नाटकात उपलब्ध नसलेलं स्थल स्वातंत्र्य या वेळी सुबोध भावेंनी दिग्दर्शक म्हणून फार सुंदरपणे हाताळले आहे. मला खात्री आहे की हा चित्रपट आपण सर्वांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन पहिला असेलच. पण इतकी सुंदर कलाकृती पुनःपुन्हा पाहण्याची संधी आता आपल्या अगदी दारात चालून आली आहे. तेव्हा ही संधी तुम्ही आजिबात दवडू नका आणि अभिषेकी बुवांच्या पदांसोबतच शंकर एहसान लॉय यांच्या गाण्यांचा, सुबोध भावे, सचिन पिळगांवकर, मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर आणि प्रथमच अभिनय करणारे शंकर महादेवन यांच्या उत्तम अभिनयाचा आनंद घरबसल्या हवं तेव्हा नक्की घ्या.

  • शब्दप्रभु बाकीबाब

    माझ्या गोव्याच्या भूमीत
    गड्या नारळ मधाचे….

    आपल्या मातृभूमीचे कौतुक सांगणाऱ्या या छान गेय ओव्यांनी शाळेत असताना बाकीबाब यांचा परिचय आम्हा शाळकरी पोरांना पहिल्यांदा करून दिला. पण “बोरकर” ही काय झिंग आणणारी नशा आहे फार नंतर कळलं.

    आज ३० नोव्हेंबर, बाकीबाब म्हणजेच बा भ बोरकर यांचा जन्मदिवस.

    बा भ बोरकर तथा बाकीबाब

    या गोवेकर मधुर रसाळ पद्मश्री शब्दप्रभूच्या जन्मदिवसानिमित्त त्यांच्या सौंदर्याचा आस्वाद देणाऱ्या असंख्य मराठी, कोकणी कवितांपैकी एक

    समुद्र बिलोरी ऐना
    ~~~~
    समुद्र बिलोरी ऐना,
    सृष्टीला पाचवा म्हैना
    वाकले माडांचे माथे ,
    चांदणे पाण्यात न्हाते
    आकाशदिवे लावीत आली,
    कार्तिक नौमीची रैना
    कटीस अंजिरी नेसू ,
    गालात मिस्कील हसू
    मयूरपंखी मधुरडंखी,
    उडाली गोरटी मैना
    लावण्य जातसे उतू,
    वायाच चालला ऋतू
    अशाच वेळी गेलीस का तू,
    करून जीवाची दैना….
    ~~~~
    – बा भ बोरकर

  • सूर

    music-159868_1280कधीकधी आठवण येते त्या बंदीशींची,
    त्या सुरांची ज्यात माझं मन पार बुडून गेलेलं असायचं,
    त्याच्या डोळ्यातली चमक वाटायची एखादी सळसळत गेलेली तान तर त्या पापण्यांची उगाच होणारी फडफड ऐकवायची एखादी लकेर.
    त्याच्या कटाक्षात भासायचे मालकंसाचे आरोह अवरोह

    त्याच्या नुसत्या अस्तित्वानेच माझ्या मनात संगीत भरून जात असे.
    अन् माझ्या हृदयाची धडधड त्याच्या हृदयाच्या धडधडीच्या तालाशी जुळवून घेई. त्या नाजूक क्षणात सुद्धा ऐकू येई एखादी बनारसी ठुमरी जेव्हा आमची शरीरे बोलत होती.

    इतकंच कशाला त्याच्या निःशब्दतेत सुद्धा एक अनाहत नाद घुमत होता.

    या संगीताने माझ्यातली पोकळी भरून काढली आणि आमच्यातील द्वैत संपवलं. मेंदूतील कंपनांनी या सुरांशी जुळवून घेतलं आणि कानात हे सूर अखंड वाजत राहिले. त्याच्या संगीताची इतकी धुंदी होती की जणू त्या सुरांच्या बेड्याच पायी पडल्या.

    पण, पण या मैफिलीत सुरसंगत माझी होती, त्याच्या मागे बसून त्या सुरवटींचा पाठलाग करणं हेच जणू माझं प्राक्तन होतं. त्याच्या दुर्गम अशा लायकारीला शरण जाणं भागच होतं म्हणा.

    त्यानी उभ्या केलेल्या या ख्यालविश्वात माझे मंद्र आणि तयार सूर सुद्धा जागच्या जागी चपखल बसले होते, कारण, कारण हे विश्व आमचं होतं. ते सूर “आम्ही” होतो…
    ~~~
    मूळ इंग्रजी मुक्तछंद
    – आरुषी सिंघ

    भावानुवाद
    -आदित्य साठे

  • Home

    Home is where the heart is
    and my heart is anywhere you are…

    I connect with these lines by Elvis from the moment we sealed our bond of togetherness. I remember it was one of my summer breaks many years ago when I met you for the first time. You were dressed in fresh yellow and had a glowing face. After initial awkward introductory moments, our conversations took hold and grew naturally from topic to topic. By the time we called it a night, the one thing I knew was that it is going to be a lifetime relationship.

    FB_IMG_1541739847951
    Some of the books from my book-shelf

    Our conversations never had a dull moment. You are a great storyteller. I always wonder how can you know so many stories from different worlds and times, carrying such a variety of emotions. These years of togetherness have deepened the bond we share and nothing can part us ever. You are always with me, whether piled up by my side smelling bookish or stocked up in my reader on my phone or in my backpack waiting to be picked up by me again in my free time.

    It doesn’t matter if I am traveling and staying in some hotel room or relaxing at my rented place. I always feel at home whenever I read you and enjoy the stories you have to tell.

    Home is where the heart is
    and my heart is anywhere you are…