मन पाखरू पाखरू,
फिरतसे सैरभैर.
कधी इथे कधी तिथे,
न ठरे कुठे स्थिर.
मन विशाल आकाश,
एक अथांग पोकळी.
कधी दाटतात मेघ,
फोडतात डरकाळी.
मन सागर तो खोल,
नाही दिसे कुठे तळ.
एक निळाई गंभीर,
तिला नाही कुठे खळ.
कसे न्यारे आहे रूप,
अशा अथांग मनाचे.
इंद्रधनू हे सजले,
जणू विविध रंगांचे.
Leave a Reply