लोकशाहीतली दडपशाही………

नमस्कार….

सध्या दर आठवड्यात नवीन बातमी येते… अमुक चित्रपटाचे प्रदर्शन तमुक पक्षानी रोखले… तमुक चित्रपटाला अमक्या अमक्या नेत्याचा आक्षेप.. आज ह्या संघटनेनी चित्रपटातील या भागावर आक्षेप घेतला.. अरे काय चाललाय काय??? भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे कि नाही??? चित्रपटात जर काही वाईट असेल तर त्याबद्दल निर्णय घेण्यासाठी सेन्सोर बोर्ड बसवला आहे नं??? मग ह्यांना कशाबद्दल तक्रार आहे??? अगदीच काही आक्षेपार्ह आहे जसे राष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणारी काही दृश्य आहेत, अथवा सामाजिक नितीमत्तेला अडथळा ठरतील असे काही आहे. तर ठीक आहे कि.. पण तसे नसतांना हे आक्षेप घेतले जातात. नाही घेतले तर त्यांच्याच अस्मितेला धक्का बसेल ना… अहो चित्रपटाच्या नावात एक सर्वसामान्य माणसाच्या तोंडी अगदी एखाद्या नेहमीच्या शब्दासारखी असलेली शिवी आलीच; जिला लोकांचा काहीच आक्षेप नाही हा; उगीच एखादी संघटना उठते आणि विरोध करते. इतकीच शिवराळ भाषेबद्दल तिडीक असेल तर त्यांनी किमान १ महिना तर सोडा पण १ आठवडा एक पण शिवी तोंडातून ना काढता राहून दाखवावं. अशक्य आहे. चीड आली कि पहिले शिवीच बाहेर पडते ना? मग त्या चित्रपटातून सध्याच्या शिक्षणपद्धाती बद्दलची चीड तर दाखवायची होती. मग त्यांनी काय वापरावा नावात अशी त्यांची अपेक्षा होती? शिक्षणाचा उदो उदो???

आज काय तर म्हणे आम्ही माय नेम इज खान नाही दाखवू देणार. त्या आधी सगळ्यांनी शिवाजी राजे भोसले बोलतोय बघावा.. अरे ह्यात काय तर्कसंगती आहे??? शिवाजी राजे आधीच सगळ्यांचा बघून झाला आहे की. आणि कोणत्या गोष्टींची तुलना करताय??? माय नेम इज खान काय अफझलखानावरचा चित्रपट आहे की शाहिस्तेखानावरचा की ज्याची तुलना “मी शिवाजी राजे भोसले बोलतो आहे” शी व्हावी? का त्यात सांगितलं आहे की महाराष्ट्रात जा आणि सगळ्या मराठी लोकांना भारताबाहेर हाकलून द्या? अरे कशालापण विरोध करायचा का? नशीब त्या हरीश्न्द्राच्या निर्मितीकथेचं नाहीतर एखादा दादासाहेबांचा वारस उठून त्याला ऑस्कर मध्ये पोहोचवण्याच्या आधीच खाली ओढून घेऊन आला असतं. कारण दिला असतं दादासाहेबांचे केस उजवीकडे जास्त होते. अश्या क्षुल्लक कारणांसाठी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवितात. दंगा करतात, तोडफोड करतात. पण हे लोक विसरून जातात की आपण जे मोडतो ते सरकार आपल्याच पैश्यातून भरून काढणार आहे… ते थोडीच स्वतःचे पैसे टाकणारेत.

अजून एक खूळ निघालं आहे. सरकार म्हणत आम्ही चित्रपटगृहांना पोलीस संरक्षण देऊ. आता मला सांगा, कोण शहाणा माणूस इतक्या पहाऱ्यात थेटरात जाईल? त्याला काय हौस आहे पैसे खर्चून डोक्याला ताप करून घ्यायची?? तो गप घरी सी डी आणून नाही बघणार?? म्हणजे तुमच्या विरोध वगैरेचा काही उपयोग झाला का?? लोकांनी बघायचा तो बघितलाच की… उगीच आपली शक्ती वाया घालवायची आणि दहशत निर्माण करून सामान्य लोकांना त्रास द्यायचा. जेणेकरून या लोकशाहीत लोक आपल्या नावानी दडपून जातील. मग आपल्याला मोकळा रान मिळेल नको ते उद्योग करायला…. हे काय एखाद्या पक्षाचे नाही… सगळेच पक्ष इथून तिथून सारखेच आहेत. जो तो लोकांना दडपायला बघतो आहे. असं वाटत या लोकशाही पेक्षा दडपशाहीच बरी होती. इथे नुसतीच नावाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचे स्वातंत्र्य, पण जरा कोणी काही मोठ्या नेत्याबद्दल बोलला की त्याचा खूनच काय तो व्हायचा बाकी उरतो… अरे कुठे आग असल्याशिवाय धूर निघत नाही न??? नेते मंडळीनी छान वागा तुम्हाला कशाला विरोध करायची वेळच येणार नाही न.


Discover more from Adi's Journal

Subscribe to get the latest posts sent to your email.


Comments

2 responses to “लोकशाहीतली दडपशाही………”

  1. Thumbs up! Ithe eka cinema la police protection milata.. pan samanya mansasala kadhich milnar nahi…

  2. sahi article..

Leave a Reply