तुझ्या डोळ्यांबरोबरच उगवतीला तांबडं फुटतं,
डोळे मिटताच सारं विश्व रात्रीत गुडूप होतं.
तुझे डोळे, कधी निळ्याशार गहिऱ्या डोहासारखे,
तर कधी उमटतात भाव खळाळत्या लाटांसारखे.
तुझ्या डोळ्यातच उमलतो माझ्या विश्वाचा पसारा,
तुझे डोळेच माझ्या जीवनलहरींचा किनारा.
Leave a Reply