प्रचंड उकाड्याची एक ढगाळ संध्याकाळ. उन्हाळ्यातलीच, पण मळभ दाटून आलाय. विनय एकटाच आपल्या खोलीत अंधारातच बसला होता. टेबलवर तासाभरापूर्वी वाफाळता असलेला चहाचा कप आता थंडपणे भरलेला. बाजूला अॅश ट्रेच्या खाचेत बऱ्याच वेळात त्याच्या ओठापर्यंत न पोचलेली सिगारेट जळत जळत फिल्टर पर्यंत पोहोचली होती. तंद्री लागल्यासारखा तो त्या धुराच्या उठणाऱ्या वलायांकडे पाहत होता. समोर टेबलावरच त्याचं रायटिंगपॅड पानं फडफडवत होतं. त्यावर लिहिलेल्या चार शब्दांपलीकडे त्याला काहीही सुचत नव्हतं म्हणा किंवा खूप काही मनात होतं पण ते विचार कागदावर येईपर्यंत मन त्यांचा हात पकडून कुठे तरी लांब पोहोचत होतं. आणि न प्यायलेल्या सिगारेटच्या धुरात विनय त्या विचारांच्या मागे कुठेसा हरवला होता.
अजून वेळ आहे म्हणता म्हणता लेखाची डेडलाईन परवावर येऊन ठेपली होती. गेले दोन वर्ष एका आघाडीच्या दैनिकासाठी तो दर आठवड्याला एक सदर लिहितोय. (more…)