Tag: broken heart

  • तुज विचारायचे होते…

    का आठव येतो आज, मन भावुक माझे होते,
    तव नाजूक गंधकुपिला, भूतात दडवले होते,

    का आज माझिया मनीचे, अस्वस्थ पाखरू होते,
    जणू पुनःपुन्हा भटकून, काहीसे शोधत होते,

    का कळले नाही मजला, तुजपाशी उत्तर होते,
    ओठांत अडकले माझ्या, जे विचारायचे होते,

    जर पुन्हा झाली भेट, तुज विचारायचे होते
    का आज मनाने तुही, तहानला चातक होते…

  • हा मार्ग शोधतो मी…

    textgram_1515906162

    कित्येक वर्ष सरली, तुज दूर जाऊनीही,
    का आज आठवांशी, निशस्त्र भांडतो मी..

    का मोजले मला तू, दुजा कुणी म्हणुनी,
    हा विद्ध जाहलेला, तक्रार मांडतो मी..

    तू दूर लोटले का, मज आपुले म्हणुनी,
    कोडे कसे सुटावे, हा मार्ग शोधतो मी…