Your cart is currently empty!
माणसाला आयुष्यात हवा असतो एक गोंधळ,
कायम आपल्याभोवतीच घातला जाणारा..
अगदी जन्माला आल्यापासूनच हट्ट असतो,
सतत गोंधळ मागण्याचा.
अगदी लहान असतो नं तेव्हाच या गोंधळाची होते सुरुवात,
सुरवातीलाच मंजुळ आवाजाचा मजा देणारा एक गोंधळ घेऊन खेळणी येतात.
या खेळण्यांचा तो गोड गोंधळ हळूच मागे सोडतो,
आणि आपण आपसूक बागीचातल्या गोंधळात रमतो.
मागोमाग येतोच शाळेचा धमाल मस्तीचा गोंधळ,
बागेतल्याला सोबत नको का कुणाची?
शाळेतला धिंगाणा आठवणीत ठेवून मग येतो एका मोठ्ठ्या गलक्यात,
महाविद्यालयाच्या हो..
तिथेच भेट होते ती एका नाजूक जिव्हाळ्याच्या
अगदी हवाश्या गोंधळाची जो थेट आपल्या मनाचाच ताबा घेतो.
पुढे हा चोरून लपून दोघांनी घातलेला गोंधळ घरचा होतो,
अगदी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने.
एका आवडीच्या गलक्याला सुरवात होते.
जोडीनी चालवायच्या गाडीचा आनंदासकट,
एक कुटुंब समाधानानी गप्पाष्टकांचा गोंधळ मांडत.
हळूच एक बारीक नवजात आवाज येतो,
आणि सगळा गोंधळ स्वतःभोवतीच जमा करतो.
या सगळ्या गोंधळ गालाक्याची मजा घेत जगत असतो आपण,
हळूच कधीतरी येते त्या शांततेची चाहूल.
मन सुन्न करणारी ती शांतता, कधीही नं अनुभवलेली,
कधीच नको असलेली…..
ती शांतता मागे टाकून जोर एकवटून आपण झेप घेतो,
झेलायला तो असतोच हजर, हो तोच तो… लाडका गोंधळ…
आपल्या साऱ्या सख्या सोबत्यांबरोबर.
मग की खूप जास्त गोंधळ, गडबड, धिंगाणा,
मजा आणि असतो आपल्या आवडीचा गलकादेखील.
सगळी मजा करताना अगदीच अचानकपणे;
आपण निघून जातो….
खूप खूप दूर कायमचे,
एका अखंड शांततेच्या प्रवासाला.
काही आठवणींचा आवाज कुणाच्या तरी ओंजळीत टाकून,
त्याचा कधी तरी प्रचंड गोंधळ होईल या वेड्या आशेवर…….
Discover more from Adi's Journal
Subscribe to get the latest posts sent to your email.
Comments
6 responses to “एक गोंधळ…….”
Atyant surekh kavita! he varati rahu de (keep it up)!!!
mastach re adi..far chhan jamliy!
nice…! I liked it…..Gondhal…..Bhari aahe……
very nice……..very gud!!!! keep it up!!!!..
Its indeed very awesome!! Hats off to your imagination level
Khup chan .
Keep going .
ALL THE VERY BEST.
Leave a Reply