Tag: wars

  • रंग युद्ध

    बेरंग अश्या या दुनियेचा
    रंग हवा तो मी बघतो.
    रंगाचा ज्या चष्मा मी
    डोळ्यांवरती चढवितो.

    रंगांचे त्या युद्ध चालते
    भगव्याशी हिरवा लढतो
    तलवारीसह महान मी,
    लाल हे गर्वाने म्हणतो

    निळा कधी तो एकांडाच
    स्वतंत्र गादीवर बसतो
    निर्वासित गरीब पिवळा
    तोंड दाबून मार खातो.

    पेटलेल्या या युद्धातून
    पाट रक्ताचा वाहतो
    एकंच रंग रक्ताचा त्या
    माणूस का लढत राहतो.