Your cart is currently empty!
Tag: Mother
हाक…
कधीतरी पसारा आवरताना लागते हाती एक गाडी, तुझा हट्ट पुरवताना मी मात्र झाले होती वेडी. तुझं वाढतं वय घेऊन गेलं तुझा हट्ट, अजूनपण वाटतं येऊन तुला मिठीत घ्यावं घट्ट. नोकरी संसारात गुरफटून गेलायस खूप लांब, कधीतरी परत येऊन मला तुझ्या गमती सांग. पळत दारात येऊन “आई भूक….” म्हण. बघ तुझ्या आठवांच्या झोपाळ्यावर झोके घेतं वेडं…