थोडे हिंसेबद्दल

आजकाल सगळीकडेच हिंसाचार माजलाय, हिंसक प्रवृत्ती वाढत आहेत, अल्पवयात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय या साऱ्या चर्चा रंगलेल्या असतात. पण या साऱ्यामधे लोकांना अपेक्षित हिंसा असते ती शस्त्रानी अथवा शारीरिक ताकदीच्या जोरावर झालेली हिंसा. हिंसा ही काही फक्त एखाद्याला गोळ्या घालून, चाकू भोसकून ठार मारलं तरच होते असं नाही. अथवा एखाद्याला जबर मारहाण करून जखमी केलं तरच हिंसा होते असं नाही. मला आज बोलायचय ते एका वेगळ्या हिंसेबद्दल. मनात येणाऱ्या आशा – आकांक्षांना पल्लवीत करण्याऐवजी दाबून टाकले जाते. मी बोलतोय ते या हिंसेबद्दल.

कुणाच्या मनात फुलत असतात ती नवनिर्मितीची स्वप्नं पण त्यांना जाग आणून धोपट मार्गांवर ढकलण्याच पातक करतो आपण अगदी नकळतपणे. सतत दाखवला जातो तो दुसऱ्यांनी त्या मार्गांनी केलेल्या प्रगतीचा आदर्श.

Continue Reading