Adi's Journal

Pieces of my thourhgs

देवा, नाही झाला घोटाळा?

देवा मला सांग अगदी खरी गोष्ट एक,
बेट्या माणसाला का नाही बनवलास नेक?

मारे दिलीस बुद्धी त्याला तू सकस,
पण का दिलास मनात आकस?

कणभरही स्वतःची प्रगती नाही,
दुसऱ्याची आजीबात पाहवत नाही.,

भ्रष्ट हावरट एकजात हा माणूस सगळा,
वरून बगळा आतून पक्का कावळा काळा.

नाही पडत का हा प्रश्न कधी तुला?
माणसाला बनवून नाही झाला घोटाळा?

Related Posts

6 thoughts on “देवा, नाही झाला घोटाळा?

Leave a Reply