Adi's Journal

Pieces of my thourhgs

सामाजिक उत्क्रांति: आगीचा वापर, शेती अणि औद्योगिक क्रांति..

आत्ताच फेसबुकवर भटकता भटकता शेतीच्या उगम कधी झाला असेल यावर एक पोस्ट बघितली आणि अचानक काही महिन्यांपूर्वी वाचनात आलेल्या एका लेखाची आठवण झाली. एकूणच मानवाच्या सामाजिक विकासच आढावा घेणार अत्यंत अभ्यासपूर्ण असा लेख यूनीवर्सिटी ऑफ़ एमस्टरडॅम मधे अधिव्याख्याता (professor) जोहान गॉड्सब्लॉम (Johan goudsblom) यांचा तो लेख होता. 1991 साली University of Leicester इथे दिलेले एक व्याख्यानच लेख स्वरुपात प्रसिद्ध केलेले आहे.

“The Civilizing Process and the Domestication of Fire” हा विषय मांडताना ते म्हणतात की कुठल्याही संस्कृतिच्या उदयच 0 बिंदू कधी असू शकत नाही कारण ती कोणत्या न कोणत्या आधीच्या संस्कृतीतून उगम पवलेली असते. पण एकूणच सामाजिक प्रगतिचा विचार केला तर मानवाच्या प्रगतितील दोन महत्वाच्या घटनांचा विचार गांभिर्यानी करायला हवा कारण त्यामुळे एकूणच मानवी समाजात अमूलाग्र बदल घडले आणि सामाजिक जडणघडण व्हायला चलना मिळत गेली.
मानवाला मिळालेले अग्निवरचे नियंत्रण आणि पुढे कित्येक वर्षांनी लागलेला शेतीचा शोध हेच ते दोन महत्वाचे टप्पे. शिवाय अगदीच अलीकडे घडलेले औद्योगीकरण हा देखील एक महत्वपूर्ण घटक आहेच. या तीनही घटनांनी मानव समाज पुनःपुन्हा नव्यानी समाजाच्या पुनर्रचनेला सामोरे गेला.

अग्निवर मिळालेल्या प्रभुत्वनि समाजात एक प्रकारची सत्ता म्हणा किंवा अधिकारचि उतरंड म्हणा रूढ झाली. पण त्या सत्तेला, अधिकारांना कर्तव्यची जोडही होती. आपल्या समाजाला गरजेला अग्नि उपलब्ध असायलाच हवा याची व्यवस्था बघण्यासाठी विशिष्ठ वर्गाचा उदय झाला. याचे आणखी एक कारण असावे की त्याकाळी मानवी वस्ती पाण्याच्या जवळपास असे, प्रत्येकच माणसाकडे वर्षभर अग्नि पेटता ठेवायल पुरेसा कोरडा लाकुडफाटाही नसायचा आणि अग्निवरचे नियंत्रण सूटले तर सारेच रख होण्याची भीतीही होतीच.

त्यातूनच पुढे कधी शेतीचा उगम झाला आणि पुन्हा एकदा समाजव्यवस्था ढवळून निघाली. माणसाची भटकंती बंद जाली. वर्षभराच्या अन्नाची सोय आता एकच ठिकाणी होउ लागली. या नवीन प्रघातांमधे रुळेपर्यंत माणसाने अग्निवर पूर्ण प्रभुत्व मिळवले होते आणि या दोन्हीचा एकत्र उपयपग केल्याने जगभरतल्या मानव समजांची सर्वांगानी भरभराट होउ लागली.

याच भरभराटीतून पुढे विज्ञानात प्रगती होउ लागली आणि तीसरे महत्वाचे स्थित्यंतर समाजक्षितिजावर दिसू लागले. अगदी अलीकडच्या कलतले स्थित्यंतर असल्याने औद्योगिकरणाचे परिणाम आपल्या साऱ्यांनाच नेहमीच्या अनुभवाचा विषय आहेत.

ते सम्पूर्ण व्याख्यानच खूप सखोल टिपण्णी करणारे आहे. आपल्या साऱ्यांना वाचण्यासाठी त्याची लिंक इथे देतो आहे.

The Civilizing Process and the Domestication of Fire

Related Posts

Leave a Reply