८ वर्षाचे चरित्र….

या लेखाच्या सुरुवातीलाच मला प्रांजळ पणे सांगावे वाटते कि मला कोणावरही वैयाक्क्तिक टीका करायची इच्छा नाही. पण लिखित स्वरुपात काही समोर आले म्हणून हे लिहावे वाटले. आज काही पुस्तके मागवावीत म्हणून इंटरनेटवर शोधात होतो, अचानक पणे पुस्तक समोर आले ते श्री राहुल गांधी यांच्या चरित्राचे. त्यांनी कार्य केले यात वाद …

कसले हे नियोजन?

भारताच्या नियोजन आयोगाच्या कृपेनी भारताच्या शहरात राहणाऱ्या लोकांना नवीन ओळख मिळाली आहे. ही ओळख आहे श्रीमंतीची. होय, तुम्ही दिवसाला २९ रुपये खर्च करता का? मग तुम्ही श्रीमंत आहात. तुम्ही दिवसभरात दोन वेळचं जेवता? होय तुम्ही श्रीमंत आहात. तुम्ही दोनदा चहा पिता? होय तुम्ही श्रीमंत आहात. नियोजन आयोगाच्या कृपेनी आज भारतातील दारिद्र्यारेशे खालील माणसे खूप …

पडलो तरी आमचे नाक आहे ते वरच…..

गेले काही दिवस भारताच्या इज्जतीचे पंचनामे लगोलग जगभर प्रसिद्ध होत आहेत. कारण तर सगळ्यांनाच माहिती आहे. बहुचर्चित (अर्थातच या सगळ्या प्रकारांनी) राष्ट्रकुल स्पर्धा. ज्या आपल्याकडे होणार हे खूपच आधी समजले होते (सुदैवच म्हणायाचे). मग आपले महारथी कलमाडी साहेब पुढे आले आणि सगळे संयोजनाचे खा ते (खाते) आपल्या समर्थ हातांत घेतले. …

चला मंडळी राम राम….

बरंय भक्त मंडळींनो, दहा दिवस कसे गेले कळलंच नाही न? हे दहा दिवस मी तुमच्याबरोबर खूप मजेत घालवतो दर वर्षी. नेहमी वाटत; तुम्हाला सोडून जाऊ नये. पण काय करणार? येतानाच नवा मोबाईल घेतलाय नं. मिस कॉल्सचा पाऊस पडेल हो लगेच त्यावर. इथे काय किंवा स्वर्गात काय, घरची मंडळी सगळी सारखीच!!! …

पाणी : निसर्गाची अमूल्य देणगी…..

आज बऱ्याच दिवसांनी काही लिहिण्याची इच्छा झाली, आत्ताच फेसबुक वर एक चित्रफित बघितली. सध्याच्या म्हणजे दर उन्हाळ्यात सगळी कडे भेडसावाणाऱ्या पाण्याच्या समस्ये बाबत असलेली ती चित्रफित बघून अक्षरशः मन विचारप्रवृत्त झालं आणि सरळ कागद समोर ओढून हे शब्द उतरवू लागलोय. पाणी; निसर्गाची मानवाला मिळालेली एक अमूल्य देणगी. पाणी म्हटलं कि समोर येते …

वर्षाऋतू …..ऋतू नवजीवनाचा…..

उन्हाळ्याचा शेवट…मे महिन्याचे शेवटचे दिवस. सगळीकडे नुसत्या सुकाल्याच्या खुणा पसरलेल्या. भेगाळलेली जमीन, झाडे जणू जळून गेलेली, गवत वळून सोने झालेले, प्राण्यांची अन्न-पाण्यासाठी वणवण चालू. लोक पंख्याकडे बघत उकाडा दूर न केल्याबद्दल त्याला दोष देत घामाघूम होतायत. सूर्य तर केवळ जणू जगाला भाजून काढण्यासाठीच तळपतोय. सगळेच लोक घामेजून पाण्याच्या आणि शीतपेयांच्या शोधात आहेत. कुत्री …