वाट

आयुष्याच्या वाटेवर चालताना कुठलंसं वळण येतं मागचं सारं मागे सोडत नवीन जग समोर येतं....

प्रतिबिंब

दुसऱ्याला दाखवताना कधी त्यालाही वाटते, माझेही प्रतिबिंब कुणी मला दाखवावे.

पाउस आणि तो,

पावसाची पहिली सर येताच आठवते तुझे हसू,, जवळ तू नाहीस बघून डोळ्यात दाटतात आसू.... ----|||---- बाहेर लागलीये पावसाची झड, उसंत नाही कायम झरझर. संध्येच्या या धुंद एकांतात, मनात बरसतेय आठवांची सर. ----|||---- कुंद धुंद एकांत हा, विरहाचा सोबती, गुलाबी थंड वर अन, एकटा मी एकांती. ----|||----

त्या दिवशी दुरवर एकटाच फिरताना, सागरावरून येणारा गार वर पिताना, ओठी होते हसू तुझी आठवण काढताना, नयनी मात्र आसू हा विरह सोसताना...

वेडी आशा

कशी कळावी सखे तुजला मौनाची ही भाषा, माझ्या मनी उगीच दाटे अनामिक वेडी आशा.

सये डोळ्यांमध्ये तुझ्या, खोल गहिरा गं भाव, खोल डोहात त्यांच्या, वाटे बुडून राहावं.

मनाची सफर

एका शांतशा संध्येला, मन मनात म्हणालं, दूर क्षितिजाच्या पार, जरा सफारीला जावं.

घोंगावता गार वारा एकाकी सागर किनारा, लाट फुटे रोरावती, मीही निशब्द एकटी.

प्यार…

ये प्यार ही है जो दिलमे बसा रहता है, जो हर पल हमें झिंदा रखता है. क्या फर्क है जो करो इन्सानसे या उपरवालेसे...

Proudly powered by WordPress | Theme: Baskerville 2 by Anders Noren.

Up ↑